पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 26 OCT 2023 9:27PM by PIB Mumbai

हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

"आमच्या पॅरा तिरंदाजी मिश्र संघासाठी हे गौरवशाली सुवर्णपदक आहे.

शीतल देवी आणि राकेश कुमार यांच्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन.

हा गौरव त्यांची अचूकता, समर्पण आणि अपवादात्मक कौशल्याचा दाखला आहे.” 

*****

NM/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1971823) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam