पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीच्या पुरुष दुहेरी-डब्ल्यू1 प्रकारात आदिल मोहम्मद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2023 11:47AM by PIB Mumbai
चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीच्या पुरुष दुहेरी-डब्ल्यू 1 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या आदिल मोहम्मद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“तिरंदाजीच्या पुरुष दुहेरी-डब्ल्यू 1 प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल आदिल मोहम्मद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल यांचे हार्दिक अभिनंदन.
त्यांची खेळातील अचूकता, संघभावना आणि अढळ निश्चय यांनी आपल्या देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. त्यांचे ध्येय सदैव उंच असुदे हीच सदिच्छा. ही उत्कृष्ट कामगिरी संपूर्ण भारत मोठ्या अभिमानासह साजरी करत आहे.”
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971342)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam