पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिवराजन आणि नित्या श्री सिवन यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 10:13PM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराजन आणि नित्या श्री सिवन यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले की या दोघांनी मिळवलेले हे यश त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी एसएच 6 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शिवराजन आणि नित्या श्री सिवन यांचे अभिनंदन.
त्यांनी एकत्रितपणे दाखवलेली उत्कृष्टता आणि त्यांच्यातील समन्वय यांनी एक अमीट छाप सोडली आहे. असे भव्य यश म्हणजे त्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे. भारत त्यांचे हे यश नेहमीच साजरे करत राहील.”
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971334)
आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam