पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये शॉटपुट F-56/57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल होतोझे देना होकाटो चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये शॉटपुट F-56/57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल होतोझे देना होकाटो चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

शॉटपुट F-56/57 प्रकारच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल  होतोझे देना होकाटो चे अभिनंदन. भारताला त्याची असामान्य  ऊर्जा आणि सामर्थ्याचा अभिमान आहे. त्याची पुढील वाटचाल अधिक वैभवशाली विजयाने संपन्न होवो. 

 S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971152) Visitor Counter : 82