पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दीप्ती जीवनजीचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2023 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक चतुर्थांश मैल(साधारण 400 मीटर) अंतर शर्यतीत वाकबगार असलेल्या दीप्ती जीवनजीचे अभिनंदन केले आहे.
या कामगिरीचे उत्तुंग असे वर्णन करत पंतप्रधान म्हणाले की जीवनजींचे मैदानावरील चैतन्य अतुलनीय होते.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर टिप्पणी केली:
"दीप्ती जीवनजी यांची उत्तुंग कामगिरी! दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दीप्ती यांचे अभिनंदन. मैदानावर धावताना त्यांनी दाखवलेले चैतन्य अतुलनीय होते. ते पाहून प्रेक्षक गुंग झाले. आपल्या सर्वांना अभिमानास्पद ठरणारी कामगिरी बजावल्याबद्दल दीप्तीचे अभिनंदन."
* * *
S.Patil/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970455)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam