पंतप्रधान कार्यालय
कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा पार्वती कुंड आणि जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग येणे, हे विशेष आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2023 11:52AM by PIB Mumbai
उत्तराखंड मधील कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर ही स्थाने भेट द्यायलाच हवी अशी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
"जर मला एखाद्याने विचारले की उत्तराखंडमधील असे एखादे स्थान सांगा जिथे भेट द्यायलाच हवी असे तुम्हाला वाटते, तर मी कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर या ठिकाणांचा उल्लेख करेन. येथील नैसर्गिक सौन्दर्य आणि देवत्वाची प्रचिती तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. "
"अर्थातच उत्तराखंडमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत आणि मी स्वतः देखील या राज्याला अनेकदा भेट दिली आहे. यामध्ये पवित्र केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराचा समावेश असून तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. मात्र, कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा पार्वती कुंड आणि जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग येणे, हे विशेष आहे."
असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे.
***
NikitaJ/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967624)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam