पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  इस्रायलच्या पंतप्रधानांसमवेत संवाद


इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांबद्दल पंतप्रधानांनी शोक आणि सहानुभूती केली व्यक्त

सध्‍याच्या  कठीण काळात सर्व भारतीय  इस्रायलसोबत एकजुटीने उभे असल्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

भारत दहशतवादाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, याचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार

पंतप्रधान नेतान्याहू यांनी इस्रायलमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधानांना दिले आश्वासन

Posted On: 10 OCT 2023 5:09PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून  दूरध्वनी आल्यानंतर उभय नेत्यांनी संवाद साधला.

इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांप्रती पंतप्रधानांनी तीव्र शोक आणि सहानुभूती व्यक्त केली आणि या कठीण प्रसंगी भारतीय जनता  इस्रायलसोबत ठामपणाने  उभी  आहे, असा संदेश दिला.

भारत सर्व प्रकारच्या  दहशतवादाचा  तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो,याचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.

इस्रायलमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. पंतप्रधान नेतान्याहू यांनी याबाबत आपले पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा असल्याची  ग्वाही  दिली.

उभय  नेत्यांनी परस्परांच्या च्या संपर्कात राहण्याविषयी सहमती दर्शवली.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966376) Visitor Counter : 102