पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत जिन्सन जॉन्सनने कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 8:35PM by PIB Mumbai
होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जिन्सन जॉन्सनचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत म्हटले आहे:
"एका मोठ्या क्रीडा व्यासपीठावर आपली कामगिरी उंचावत कांस्यपदक जिंकले आहेस! पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या अंतिम फेरीतील उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिन्सन जॉन्सन साठी जोरदार टाळ्या! त्याने यशाची नवी शिखरे गाठावीत या शुभेच्छा!"
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962970)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam