पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आशियाई स्पर्धेत सांघिक 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारतीय महिला संघाने पटकावलेल्या रौप्यपदकाबद्दल केली प्रशंसा
Posted On:
29 SEP 2023 10:07AM by PIB Mumbai
हांगझाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये दिव्या थडीगोल, ईशा सिंग आणि पलक यांच्या संघाने 10 मीटर एअर पिस्तूल (पिस्टल) प्रकारातील सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स समाजमाध्यम मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी प्रकारात भारताच्या खाती आणखी एक पदक! 10 मीटर एअर पिस्टल प्रकारातील सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल दिव्या थडीगोल, ईशा सिंग आणि पलक यांचे हार्दिक अभिनंदन. आगामी स्पर्धांतील यशासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचे हे यश उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी प्रेरणादायक ठरेल.”
***
S.Thakur/S.Chitnis/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961913)
अभ्यागत कक्ष : 128
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam