पंतप्रधान कार्यालय
गोव्यातील आग्वाद किल्ल्यावर भारतीय दीपगृह महोत्सवाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त.
Posted On:
24 SEP 2023 10:32PM by PIB Mumbai
प्रमुख पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून मला आनंद होत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आपल्या X वरील मनोगताच्या मालिकेत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत गोव्यातील आग्वाद किल्ल्यावर पहिल्या भारतीय दीपगृह महोत्सवाचे उद्घाटन केले आहे.
भारतीय दीपगृह महोत्सव हा, सागरी जलवाहतुकीतला एक अत्यावश्यक भाग असलेल्या आणि पुरातन काळातील जहाजे आणि पर्यटकांना आपल्या गूढतेने आणि निसर्गरम्य मोहकतेने आकर्षित करणाऱ्या दीपगृहांचे योगदान साजरे करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या X वरील माहितीला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“मुख्य पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून आनंद झाला. #MannKiBaat कार्यक्रमात मी या विषयावर जे भाष्य केले त्याबद्दल अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://youtu.be/kP_qEIipwqE?si=-_wpXAj5aoIdSXls
***
NM/VY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960348)
Visitor Counter : 142
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam