गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

भारत स्मार्ट शहरे परिषद 2023 इंदोर इथे 26-27 सप्टेंबर, 2023 दरम्यान आयोजित केली जाणार


भारत स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा 2022च्या विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार

Posted On: 24 SEP 2023 11:42AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर, 2023

नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार 26-27 सप्टेंबर 2023 दरम्यान ब्रीलीयंट कन्वेन्शन सेंटर, इंदोर, मध्य प्रदेश इथे, भारत स्मार्ट शहरे परिषद 2023चे आयोजन करत आहे. या परिषदेत सर्व 100 स्मार्ट शहरे सामील होतील. ही शहरे, नागरी नवोन्मेशाच्या अग्रभागी आहेत आणि नागरी विकासाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. या कार्यक्रमाद्वारे या शहरांनी देशात भविष्यात नागरी परिवर्तनातील त्यांचे उल्लेखनीय काम जगासमोर ठेवण्यासाठी मंच उपलब्ध होईल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2023 रोजी भारत स्मार्ट शहरे स्पर्धा 2022(ISAC)च्या विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल. स्मार्ट शहरे मोहीम, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार द्वारे 2018 पासून ISAC चे आयोजन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेला हा महत्वाचा निर्णय आहे, ज्यात पथदर्शी शहर नियोजन, प्रकल्प आणि विकास संकल्पना राबविल्या आहेत, त्यांची दखल घेतली जाते आणि उल्लेखनीय कामगिरी, समकक्ष सहकाऱ्यांकडून शिकणे आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार करणे यांना पुरस्कृत केले जाते. या परिषदेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई सी पटेल, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, रेल्वे, कौशल किशोर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री अश्वनी वैष्णव, मध्य प्रदेशचे नगर विकास मंत्री भूपेंद्र सिंग, हे मान्यवर उपस्थित राहतील.

या व्यतिरिक्त मध्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी, महापौर, तसेच 100 स्मार्ट शहरांचे आयुक्त, उद्योग क्षेत्रातले सहकारी, शिक्षण तज्ज्ञ आणि स्मार्ट शहरांशी संबंधित सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम 26 आणि 27 सप्टेंबर 2023 असा दोन दिवस आयोजित केला जावा, असा प्रस्ताव होता. याची विस्तृत कार्यक्रम पत्रिका परिशिष्ट ‘अ’ मध्ये जोडली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी, आयएसएसी 2022 अंतर्गत करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची माहीती देणारे प्रदर्शन आयोजित केले जाईल. त्यासोबतच, स्मार्ट सिटीजच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांसोबत संवाद तसेच, इंदूर आणि उज्जैन इथे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांना भेट देणे, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, आयएसएसी 2022 पुरस्कारांचे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण होईल. पांच राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि 31 विशेष शहरांना तसेच सात भागीदार संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. यंदा ‘आयएसएसी’ पुरस्कारांसाठी 66 जणांची निवड करण्यात आली आहे, त्याची सविस्तर यादी परिशिष्ट ब मध्ये जोडली आहे. त्याशिवाय, स्मार्ट सिटी मिशन चार अहवाल प्रकाशित करणार आहे. यात, आयएसएसी 2022 पुरस्कार संकलन, UN हॅबिटाट द्वारे अहवाल: स्मार्ट सिटीजमिशन - स्थानिकीकरण शाश्वत विकास उद्दिष्टे, SCMच्या वृत्तपत्रांचे संकलन आणि ISAC 2023 पुरस्कार पत्रिकादेखील या कार्यक्रमात प्रकाशित केल्या जातील. पुरस्कारवितरण आणि शुभारंभानंतर, पुरस्कार विजेते स्मार्टसिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) त्यांचे अनुभव आणि ज्ञान सामायिक करतील. दुसऱ्या दिवसाची सांगतासांस्कृतिक कार्यक्रमाने होईल.

 

स्मार्ट सिटीज अभियानाचा थोडक्यात आढावा

25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेल्या स्मार्टसिटी अभियानाचे उद्दिष्ट 'स्मार्ट सोल्यूशन्स' म्हणजे आधुनिक उपाययोजनांचा वापर करुन, आपल्या नागरिकांना मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरण आणि एक सभ्य जीवनमान प्रदान करणे हा आहे. देशातील शहरी विकासाच्या पद्धतीत बदल घडवूनआणण्याचे उद्दिष्ट असलेले हे एक परिवर्तनवादी अभियानआहे. या अभियानाअंतर्गत, आतापर्यंत 1.1 लाख कोटींहून अधिक किमतीचे 6,000+ प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित प्रकल्प 30 जून 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या अभियानामध्ये सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे, एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर्स (ICCC) जे सर्व100 स्मार्ट शहरांमध्ये कार्यरत आहेत. हे ICCC शहरीव्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान वापरून शहरातील सर्व कामांसाठी शरीरातील मेंदू आणि मज्जासंस्थेप्रमाणे (त्याच्याइतकेच महत्वाचे) काम करतात. गुन्ह्यांचा मागोवाघेणे, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापनइत्यादी विविध क्षेत्रात नागरी सेवांमध्ये लक्षणीय सुधारणाझाली आहे.

100 स्मार्ट शहरांनी गतिशीलता, ऊर्जा, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, विविधरंगी चैतन्यमयसार्वजनिक स्थळे, सामाजिक पायाभूत सुविधा, स्मार्ट गव्हर्नन्स इत्यादींशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये प्रकल्प हातीघेतले आहेत. उदाहरणार्थ, स्मार्ट वाहतूक क्षेत्रात. 24,265 कोटी रुपयांचे 1,192 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि16,905 कोटी रुपयांचे आणखी 494 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

 

स्मार्ट ऊर्जा क्षेत्रातील 573 प्रकल्प पूर्ण झाले असून 94 सुरू आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनि:स्सारण (WASH) क्षेत्रातील 34,751 कोटी खर्चाचे1,162 हून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 18,716 कोटी रुपये किमतीचे आणखी 333 प्रकल्प चालू आहेत. 100 स्मार्ट शहरांनी आधीच 6,403 कोटी रुपये खर्चाच्या 1,063 पेक्षा जास्त सार्वजनिक स्थळे विकसित केली आहेत आणि 5,470 कोटी रुपये खर्चाचे आणखी 260 प्रकल्प चालू आहेत.

त्याशिवाय, 8,228 रुपये कोटी किमतीचे 180 सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि आणखी 27 चालू आहेत. बाजार पुनर्विकासआणि स्टार्ट-अप उष्मायन केंद्रे यासारख्या आर्थिक पायाभूत सुविधांशी संबंधित 652 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणिआणखी 267 प्रकल्प चालू आहेत. सामाजिक पायाभूत सुविधा क्षेत्रात (आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण इ.) 679 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 153 चालू आहेत.

 

आयएसएसी पुरस्कारांचा आढावा

याआधी, आयएसएसी ने 2018, 2019 आणि 2020अशी तीन वर्षे पुरस्कार दिले आहेत. 100 स्मार्ट शहरांमधील, ज्या शहरात, प्रकल्पात आणि अभिनव कल्पनांमधून, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना प्रोत्साहन दिले जाते, अशा कार्यांची दखल घेऊन, आयएसएसी त्यांना पुरस्कृत करते. त्याशिवाय, एकात्मिक, समान, सुरक्षित, सुदृढ आणि समन्वय साधणाऱ्या शहरांची देखील दखल घेतली जाते.

ISAC पुरस्कारांची चौथी आवृत्ती एप्रिल 2022 मध्येसूरतमधील ‘स्मार्ट सिटीज-स्मार्ट अर्बनायझेशन’कार्यक्रमादरम्यान सुरू करण्यात आली. ISAC 2022 पुरस्काराची दोन-टप्प्यांची आवेदन प्रक्रिया होती, ज्यामध्ये ‘पात्रता पातळी’ समाविष्ट होती, ज्या अंतर्गत, शहराच्या कामगिरीचे एकूण मूल्यांकन अपेक्षित होते आणि त्या पुढच्या प्रस्ताव पातळीसाठी, स्मार्ट शहरांना खालीलप्रमाणे

 

सहा पुरस्कार श्रेणींसाठी त्यांची नामांकने दाखल करणेआवश्यक होते:

प्रकल्प पुरस्कार :10 विविध संकल्पना,

नवोन्मेष पुरस्कार :2 विविध संकल्पना,

शहर पुरस्कार: राष्ट्रीय आणि क्षेत्रीय,

राज्य पुरस्कार,

केंद्रशासित पुरस्कार, आणि

भागीदार पुरस्कार, 3 तीन विविध संकल्पना

 

80 पात्रताधारक स्मार्ट शहरांमधून ISAC 2022 साठीएकूण 845 नामांकने प्राप्त झाली. या नोंदींचे मूल्यमापन 5 टप्प्यात करण्यात आले. पहिल्या फेरीत 845 प्रस्तावांचीपूर्व तपासणी करण्यात आली. यातील 50% (423 प्रस्ताव) पुढच्या फेरीत गेले. दुस-या फेरीत, प्रत्येक पुरस्कारश्रेणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स(NIUA) च्या ज्युरीद्वारे शीर्ष 12 प्रस्ताव निवडण्यात आलेत. तिसर्‍या फेरीत, प्रत्येक प्रस्तावकर्त्याने विषयाशीसंबंधित तज्ञांच्या पॅनेलसमोर सादरीकरण केले, ज्यातूनसर्वोत्तम 6 प्रस्तावांची निवड करण्यात आली. शेवटी, चौथ्या फेरीत, शीर्ष 6 प्रस्तावांनी MoHUA संचालकांच्याअध्यक्षतेखालील आणि विषय तज्ञांचा समावेश असलेल्या ज्यूरीसमोर विस्तृत सादरीकरण केले.

या चौथ्या टप्प्यानंतर, स्मार्ट सिटीज मिशनच्या सर्वोच्च समितीने प्रत्येक पुरस्कार श्रेणीसाठी सर्वोत्तम तीन प्रस्ताव निवडण्यात आहेत. एकूण 845 अर्जांपैकी पाच पुरस्कारश्रेणींमध्ये 66 अंतिम विजेते निवडण्यात आले आहेत - 35 प्रकल्प पुरस्कार, 6 नवोन्मेष पुरस्कार, 13 राष्ट्रीय/क्षेत्रीय/ शहर पुरस्कार, 5 राज्य/केंद्रशासित पुरस्कार आणि 7 भागीदार पुरस्कार श्रेणींमध्ये. 66 विजेत्यांची अंतिम यादीपरिशिष्ट 1 मध्ये उपलब्ध आहे.

***

S.Pophale/R.Aghor/P.Kor

 

Annexure A: Agenda

 

Activity

Time

Day 1

26-Sep-23

Start

End

1

Inauguration of the Exhibition

10:00

 

2

Round of exhibition for dignitaries

10:00

10:30

3

Exhibition - Dedicated for School and College students

10:30

13:00

4

Site Visit to Indore projects (Batch 1)

11:00

13:00

5

Welcome Lunch at BCC (Venue)

13:00

14:30

6

Exhibition - dedicated for Govt. officials of Madhya Pradesh

14:30

16:30

7

Exhibition and Dialogues

14:30

16:30

8

Site Visit to Indore projects (Batch 2)

14:30

16:30

9

Site Visit to Indore projects (Batch 3)

16:30

18:30

10

Site Visit to Ujjain Smart City @ Mahakaal Lok (Batch 1)

17:00

21:00

11

Site Visit to Ujjain Smart City @ Mahakaal Lok (Batch 2)

17:30

21:30

12

Site Visit to Ujjain Smart City @ Mahakaal Lok (Batch 3)

18:00

22:00

13

Networking Dinner at Indore/Ujjain

20:00

21:30

14

Arrival back at Indore

21:00

23:00

Day 2

27-Sep-23

Start

End

1

Heritage Walk (first 200 registrations)

6:00

7:30

2

Participants to be seated in BCC main hall

10:00

 

3

Awardees lineup for Photo Ceremony

10:30

 

4

Arrival of dignitaries

10:30

 

5

Arrival of Hon'ble President

11:00

 

6

Hon'ble President visits exhibition

11:00

11:15

7

Photo ceremony with award winners

11:15

11:20

8

Awardees settle in hall

11:20

11:25

9

Award Function - Phase I(*Annexure B) (in presence of Hon'ble President)

11:25

12:55

10

Departure of Hon'ble President

12:55

12:55

11

Award Function - Phase II (*Annexure B)

12:55

14:00

12

Award Lunch

14:00

15:30

13

Exhibition and Dialogues

15:30

18:00

14

High Tea

18:00

18:30

15

Cultural Program

18:30

19:30

16

Gala Dinner

19:30

 

परिशिष्ठ ब : आयएसएसी 2022 पुरस्कार विजेत्यांची यादी 

अनु. 

क्र. 

पुरस्कार संकल्पना

श्रेणी

विजेत्यांचे नाव

प्रकल्पाचे शीर्षक

पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा

कोईम्बतूर

आदर्श रस्त्यांचा विकास,

तलावांचे जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवन

 

पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा

इंदूर

नदी किनारी विकास

(रामबाग पूल ते कृष्णपुरा छत्री)

 

पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा

न्यू टाउन 

कोलकाता 

 

नीम बनानी पार्क आणि इतर मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास

 

 

पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा

कानपूर

पालिका क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण 

संस्कृती 

अहमदाबाद

तंत्रज्ञानाचा विकास करुन वारसा पर्यटनाला प्रोत्साहन देणे 

संस्कृती

भोपाळ

सदर मंझिल परिसराचे नूतनीकरण  

संस्कृती

तंजावर

तलावांचे संवर्धन – अय्यनकुलम

अर्थव्यवस्था 

जबलपूर

इनक्युबेशन सेंटर

अर्थव्यवस्था

इंदूर

व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग (VCF)

10 

अर्थव्यवस्था

लखनौ

रोजगार प्रशिक्षण केंद्र

11 

प्रशासन  

चंदीगड

ई-प्रशासन सेवा 

12 

प्रशासन 

पिंपरी- चिंचवड

स्मार्ट सारथी मोबाईल ऍप्लिकेशन

13 

प्रशासन  

जबलपूर

311 मोबाईल ऍप्लिकेशनची अंमलबजावणी

14 

प्रशासन 

उदयपूर

स्मार्ट सिटी मोबाईल ऍप्लिकेशन

15 

आयसीसीसी व्यावसायिक मॉडेल 

अहमदाबाद 

ICCC व्यवसाय मॉडेल

16 

आयसीसीसी व्यावसायिक मॉडेल

सूरत

ICCC व्यवसाय मॉडेल

17 

आयसीसीसी व्यावसायिक मॉडेल

आग्रा 

ICCC व्यवसाय मॉडेल

18 

आयसीसीसी व्यावसायिक मॉडेल

ग्वाल्हेर

ICCC व्यवसाय मॉडेल

19 

वाहतूक 

चंडीगढ 

सार्वजनिक बाइक शेअरिंग सिस्टम

20 

वाहतूक

न्यू टाउन 

कोलकाता 

 

नॉन-मोटाराइज्ड वाहतुकीलाप्रोत्साहन देणे

21 

वाहतूक

सागर

स्मार्ट  वाहतूक व्यवस्थापन प्रणाली

22 

सार्वजनिक स्वच्छता 

इंदूर

गोबर धन बायो-सीएनजी प्लांट

23 

सार्वजनिक स्वच्छता

काकीनाडा

घनकचरा व्यवस्थापन प्रणाली

24 

सार्वजनिक स्वच्छता

अहमदाबाद

घरोघरी जाऊन कचरा संकलनावर देखरेख 

25 

सार्वजनिक स्वच्छता

चंदीगड

घनकचरा व्यवस्थापन प्रणाली (संपूर्ण उपाय)

26 

सामाजिक पैलू

वडोदरा

रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS)

27 

सामाजिक पैलू

आग्रा

स्मार्ट आरोग्य केंद्रे आणि महापालिका शाळांचे अद्ययावतीकरण

28 

सामाजिक पैलू

रायपूर

बी.पी.पुजारी शाळेचे अद्ययावतीकरण

 

अनु. 

क्र. 

पुरस्कार संकल्पना

श्रेणी

विजेत्यांचे नाव

प्रकल्पाचे शीर्षक

29 

सामाजिक पैलू

थुथुकुडी

स्मार्ट वर्गखोल्या आणि ईमॉनिटरिंग 

30 

शहरी पर्यावरण 

इंदूर

हवेची गुणवत्ता सुधारणे (अहिल्या वन आणि व्हर्टिकल गार्डन्स) 

31 

शहरी पर्यावरण

शिवमोग्गा

कॉन्सर्व्न्सी लेनचा विकास 

32 

शहरी पर्यावरण

जम्मू

जुन्या शहरासाठी ई-ऑटो 

33 

जल/पाणी

इंदूर

सरस्वती अणि काहन लाइफलाइन प्रकल्प 

(संकल्प),  

रेनवाटर हार्वेस्टिंग उपक्रम-वॉटर प्लस ते वॉटर सरप्लस, तलाव, विहिरी आणि कूपनलिका पुनरुज्जीवन 

 

34 

जल/पाणी

आग्रा

ABD क्षेत्राला चोवीस तासपाणीपुरवठा करणे

(स्मार्ट वॉटर मीटर आणि SCADA सिस्टीमसह)

 

35 

जल/पाणी

राजकोट

अटल सरोवराचे पुनरुज्जीवन

36 

अभिनव कल्पना पुरस्कार 

हुब्बळी धारवाड

नाल्यांचे नूतनीकरण आणि ग्रीन कॉरिडॉरचा विकास

 

37 

अभिनव कल्पना पुरस्कार 

सुरत

कॅनल पाथवे कॉरिडॉर (स्वयं-शाश्वत मॉडेल)

38 

अभिनव कल्पना पुरस्कार 

रायपूर

नालंदा परिसर

(ऑक्सी रीडिंग झोन लायब्ररी)

39 

कोविड नवोन्मेष पुरस्कार 

सुरत

कोविड 19 ला प्रतिसाद देतांना राबवलेले विविध उपक्रम 

 

40 

कोविड नवोन्मेष पुरस्कार

इंदौर 

कोविड 19 ला प्रतिसाद देतांना राबवलेले विविध उपक्रम 

 

41 

कोविड नवोन्मेष पुरस्कार

आग्रा

कोविड 19 ला प्रतिसाद देतांना राबवलेले विविध उपक्रम 

 

42 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(पायाभूत सुविधा) 

एल अँड टी कन्स्ट्रक्शन

उदयपूर स्मार्ट सिटी मध्ये “एकात्मिक स्मार्ट सिटी विकास” 

 

43 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(पायाभूत सुविधा)

एनव्हीरो कंट्रोल प्रा. लिमिटेड 

सूरत स्मार्ट सिटीमध्ये "एसटीपी आणि एससीएडीए आणि ऊर्जा निर्मिती” विषयात नवोन्मेष 

 

44 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(पायाभूत सुविधा)

एल सी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लिमी. 

"व्हॅक्युम सीवेज सिस्टिम” आग्रा स्मार्ट सिटीमध्ये 

 

45 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(MSI) 

एल अँड टी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन 

 

“एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्ष” पुणे स्मार्ट सिटी मध्ये 

46 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(MSI) 

एनईसी कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लिमी. 

“एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्ष” सूरत स्मार्ट सिटीमध्ये 

अनु क्रमांक. 

पुरस्कार संकल्पना 

श्रेणी 

विजेत्यांचे नाव 

प्रकल्पाचे नाव 

47 

भागीदार पुरस्कार : 

उद्योग

(MSI) 

हानिवेल इंडिया 

“एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्ष” भुवनेश्वर स्मार्ट सिटी मध्ये 

48 

भागीदार पुरस्कार : 

: पीएमसी

विशेष उल्लेखनीय 

पीडब्लू सी इंडिया 

विविध स्मार्ट सिटीज साठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार’ 

49 

शहर पुरस्कार (पश्चिम क्षेत्र ) 

विजेते

अहमदाबाद 

 

50 

शहर पुरस्कार (दक्षिण क्षेत्र )

विजेते

बेळगावी 

 

51 

शहर पुरस्कार (पूर्व क्षेत्र )

विजेते

भुवनेश्वर 

 

52 

शहर पुरस्कार (दक्षिण क्षेत्र) 

विजेते

कोएम्ब्तूर 

 

53 

शहर पुरस्कार (ईशान्य भारतक्षेत्र) 

विजेते

कोहिमा 

 

54 

शहर पुरस्कार (ईशान्य भारत क्षेत्र)

विजेते

नामची 

 

55 

शहर पुरस्कार (पौर्वात्य क्षेत्र) 

विजेते

रांची 

 

56 

शहर पुरस्कार (पश्चिम क्षेत्र) 

विजेते

सोलापूर 

 

57 

शहर पुरस्कार (उत्तर क्षेत्र)

विजेते

उदयपूर 

 

58 

शहर पुरस्कार (उत्तर क्षेत्र) 

विजेते 

वाराणसी 

 

59 

शहर पुरस्कार

इंदौर 

 

60 

शहर पुरस्कार

सूरत 

 

61 

शहर पुरस्कार

आग्रा 

 

62 

केंद्रशासित प्रदेश पुरस्कार 

चंडीगढ 

 

63 

राज्य पुरस्कार 

मध्य प्रदेश 

 

64 

राज्य पुरस्कार

तामिळनाडू

 

65 

राज्य पुरस्कार

राजस्थान 

 

66 

राज्य पुरस्कार

उत्तर प्रदेश 

 

 

***

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960118) Visitor Counter : 154