पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूत तिरुपथूर इथे झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीडिताना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून आर्थिक मदत जाहीर
Posted On:
11 SEP 2023 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
तमिळनाडूत तिरुपथूर इथे झालेल्या रस्ते दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने x वर पोस्ट केले आहे;
“तमिळनाडूत तिरुपथूर येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त करतो. . शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझी संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मधून दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi”
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956453)
Visitor Counter : 123
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam