पंतप्रधान कार्यालय

जी 20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

Posted On: 09 SEP 2023 8:38PM by PIB Mumbai

 

मित्रांनो,

आताच एक सुवार्ता मिळाली आहे. आपल्या टीमच्या कठोर परिश्रमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, नवी दिल्ली जी 20 नेत्यांच्या शिखर परिषद घोषणापत्रावर सहमती झाली आहे.

नेत्यांच्या या घोषणापत्राला मान्यता द्यावी असा माझा प्रस्ताव आहे. मी हे  घोषणापत्र  स्वीकारल्याचे जाहीर करतो.

या निमित्ताने मी आमचे मंत्रीगट , शेर्पा आणि सर्व अधिकाऱ्यांचे  मनःपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी कठोर परिश्रम करून हे यशस्वी केले आहे आणि म्हणूनच ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत.

आमच्याकडे हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या वेदांमध्ये म्हटले आहे एको अहम बहुस्याम्!

म्हणजे, मी एक आहे; मला अनेक होऊ दे.

 

महामहिम,

आपल्याला निर्मिती, नवोन्मेष आणि व्यवहार्य उपायांसाठी आय कडून  वी कडे  जावे लागेल.

"आय कडून वी, म्हणजे स्वतः ऐवजी सर्वांचा विचार ,स्वतः ऐवजी आपणा सर्वांचे कल्याण, यावर आपल्याला भर द्यावा लागेल.

आपल्याला जगातील प्रत्येक वर्ग , प्रत्येक देश, प्रत्येक समाज, प्रत्येक प्रदेश जोडावा लागेल.

आणि हीच  एक कुटुंबाची भावना आहे.

ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला आधार देणारी एक व्यवस्था असते, त्याचप्रमाणे आपल्याला एकत्रितपणे  जागतिक स्तरावर एक आधार देणारी व्यवस्था  तयार करावी लागेल.

कुणाचा  आनंद आपल्याला आनंदी करेल, कुणाच्याही  दु:खाने आपण तितकेच दुःखी होऊ , ही भावना आपल्या मनात असायला हवी.

जेव्हा आपण एक कुटुंब म्हणून विचार करतो तेव्हा  प्रत्येक सदस्याला कसे सक्षम बनवता येईल  हे देखील आपण ध्यानात ठेवतो.

याच भावनेने भारत आपला प्रत्येक अनुभव आपल्या विशाल जागतिक कुटुंबासोबत सामायिक करू इच्छितो.

भारतामध्ये, आम्ही विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा एक दुवा  म्हणून स्वीकार केला आहे.

भारताने बँक खाती, आधार ओळख आणि मोबाईल फोनच्या जेएएम त्रिसूत्रीद्वारे समावेशकता , पारदर्शकता आणि लक्ष्यित उपाययोजनांचे नवीन मॉडेल विकसित केले आहे.

जागतिक बँकेने सुद्धा सांगितले आहे की JAM ट्रिनिटी ने केवळ सहा वर्षात वित्तीय समावेशनाचा जो दर साध्य करून दाखवला आहे तो साध्य करण्यासाठी 47 वर्षे लागली असती.

या मॉडेलचा वापर करून भारताने गेल्या 10 वर्षात 360 अब्ज डॉलर गरजूंच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले आहेत.

यामुळे सुमारे 33 अब्ज डॉलर्सच्या गळतीला देखील आळा बसला आहे, जी जीडीपीच्या सुमारे सव्वा टक्के आहे.

निश्चित स्वरुपात हे मॉडेल जगासाठी विशेषतः ग्लोबल साऊथ साठी, संपूर्ण जागतिक कुटुंबासाठी उपयुक्त सिद्ध होऊ शकते.

 

मित्रांनो,

एक कुटुंब या स्वरुपात भारताचा युवा वर्ग देखील, आपली युवा गुणवत्ता देखील एका प्रकारे जागतिक कल्याणासाठीच आहे.

आगामी काळात जगात वृद्धी कायम राखण्यासाठी एका मोठ्या कुशल युवा गुणवत्तेच्या भांडाराची खूप जास्त गरज आहे.

म्हणूनच आपल्याला ग्लोबल स्किल मॅपिंग च्या दिशेने वळले पाहिजे.

हा ग्लोबल साऊथचा प्राधान्यक्रम देखील आहे. 

 

मित्रहो,

एक कुटुंब याविषयी बोलत असताना आपल्याला आपल्या या वैश्विक कुटुंबाला भेडसावणारी आव्हाने देखील विचारात घेतली पाहिजेत.

आम्ही हे पाहिले आहे की कोविडच्या रुपाने खूप मोठे जागतिक आव्हान निर्माण झाल्यावर अनेक दशकांपासून तयार करण्यात आलेली जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे अनावृत्त झाली.

एक कुटुंब या भावनेने आज आपल्याला अशी जागतिक पुरवठा साखळी तयार करायची आहे जी विश्वास आणि पारदर्शकतेला चालना देईल.

ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आपण देशांनी मानवतेला केवळ बाजारपेठेच्या रुपात पाहता कामा नये.

आपल्याला आणखी जास्त संवेदनशील आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाची गरज आहे.

आपल्याला विकसनशील देशांच्या क्षमता उभारणीवर विशेषत्वाने लक्ष ठेवावे लागेल.

म्हणूनच भारताने ज्या मॅपिंग चौकटीचा प्रस्ताव मांडला आहे त्यामुळे सध्याच्या पुरवठा साखळीला सशक्त करण्यात मदत मिळेल.

जागतिक पुरवठा साखळीला समावेशक बनवण्यासाठी आपल्याला लहान व्यवसायांच्या सक्रिय भूमिकेचा देखील स्वीकार करावा लागेल. 

त्यांना बाजारपेठा आणि माहितीची हाताळणी करण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्यासाठी व्यापारावरील खर्च देखील कमी असला पाहिजे.

 

मित्रांनो,

एक कुटुंब या मंत्रासह चालताना आपल्याला संवेदनशीलतेने विकसनशील देशांवरील कर्जाच्या बोज्याची समस्या देखील हाताळायची आहे.

आपल्याला अशी एक व्यवस्था बनवावी लागेल जेणेकरून संकटांनी वेढलेले देश यातून बाहेर पडू शकतील आणि भविष्यात असे संकट कधीच येणार नाही.

"ऍक्शन प्लॅन टू ऍक्सलरेट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंतर्गत अर्थसहाय्य वाढवण्यावर सहमती झाल्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे.

यासाठी तुम्हा सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

एक कुटुंब हा दृष्टिकोन, सर्वांगीण आरोग्य आणि निरामयताव्यवस्थेसाठी देखील हे तितकेच आवश्यक आहे.

भारतात विकसित होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेचया पारंपरिक औषधासाठीच्या जागतिक केंद्रामुळे सगळ्या जगात, निरामयतेला प्रोत्साहन देण्यास पाठबळ मिळेल.

मला आशा आहे की आम्ही लवकरच, पारंपारिक औषधाचे जागतिक भंडार बनण्याचा प्रयत्न करु. 

 

मित्रांनो,

जगभरातील प्रत्येक समाजात, माता, कुटुंबाला प्रेरणा देणारी शक्ती असते.

आजच्या भारतात, महिला नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिसते आहे.

भारतात स्टेम म्हणजेच  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार विषयात सुमारे 45 मुली/महिला आहेत.

आज भारताच्या अवकाश कार्यक्रमातील महत्वाच्या मोहिमा, आमच्या महिला वैज्ञानिक हाताळत आहेत. 

आज भारतातील गावागावात 90 दशलक्ष महिला, स्वयंसहाय्यता बचत गटांशी जोडलेल्या असून छोटे छोटे व्यवसाय पुढे नेत आहेत. 

मला विश्वास आहे, की महिला-प्रणित विकास, एकविसाव्या शतकातील एका खोट्या बदलाचा वाहक बनेल.

 

मित्रांनो,

एक कुटुंब या सत्रात, मी आपल्यासमोर तीन प्रस्ताव मांडू इच्छितो.

पहिले, आम्ही जगातील आघाडीच्या क्रीडा संघटनांना आग्रह करु शकतो की ते आपल्या उत्पन्नाचा पांच टक्के वाटा ग्लोबल साऊथ मधील देशांमधील महिलांच्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधांसाठी गुंतवावेत.

हा जागतिक पातळीवरील सार्वजनिक- खाजगी भागीदारीतील एक नव्या प्रकारचे मॉडेल बनू शकते.

दुसरा प्रस्ताव, ज्याप्रमाणे, सर्व देश वेगवेगळ्या श्रेणीतील व्हिसा जारी करत असतात, त्याच प्रमाणे आपण, जी-20 गुणवत्ता व्हिसाअशी एक विशेष श्रेणी बनवू शकतो. 

या प्रकारचा व्हिसा आपल्या सर्व देशातील, सर्वोत्तन विज्ञान आणि तंत्रज्ञान गुणवत्तेला जागतिक संधीचा लाभ घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. 

त्यांची प्रतिभा आणि त्यांचे प्रयत्न, आपल्या सर्वांच्या अर्थव्यवस्थामधे मोठे योगदान देऊ शकतात. 

तिसरे, आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या देखरेखीखाली, जागतिक जैव-बँक तयार करण्याचा विचार करु शकतो.

विशेषतः हृदय रोग, सिकल सेल अॅनिमिया, एंडोक्राईन आणि स्तनांचा कर्करोग अशा आजारांकडे लक्ष दिले जाऊ शकते.

अशी जागतिक जैव-बँक भारतात स्थापन करतांना आम्हाला अत्यंत आनंद होईल.

 

मित्रांनो,

आता मी आपल्या सर्वांचे विचार ऐकण्यास उत्सुक आहे.

***

G.Chippakatti/S.Thakur/S.Kane/S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956023) Visitor Counter : 129