पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
Posted On:
09 SEP 2023 7:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील जी20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. मार्च 2023 मध्ये केलेल्या सरकारी दौऱ्यानंतर पंतप्रधान मेलोनी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. या आधी मार्च 2023 मधील दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरापर्यंत उंचावण्यात आले होते. पंतप्रधानांनी भारताच्या जी20 अध्यक्षतेला दिलेले पाठबळ आणि जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये आणि भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक मार्गिकेत सहभागी झाल्याबद्दल इटलीची प्रशंसा केली.
दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याची दोन्ही नेत्यांनी समाधानाने दखल घेतली. त्यांनी भारत-इटली धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण आणि नवे आणि उदयाला येणारे तंत्रज्ञान प्रकार यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य बळकट करण्याबाबत सहमती व्यक्त केली. व्यापक जागतिक कल्याणासाठी जी 7 आणि जी20 यांनी परस्परांशी समन्वय राखून काम करण्याची गरज त्यांनी विचारात घेतली.
पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
***
G.Chippalkatti/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955890)
Visitor Counter : 172
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam