पंतप्रधान कार्यालय
4x400 मीटर रिले धावण्याच्या प्रकारात भारतीय पुरुष संघाने केलेल्या शानदार कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या या प्रकारात, भारतीय संघ अंतिम फेरीसाठी ठरला पात्र
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2023 6:21PM by PIB Mumbai
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 4x400 मीटर रिले धावण्याच्या प्रकारात, अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष संघातील अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल या चौघा धावपटूंच्या कामगिरीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान X वरील आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात :
“जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत असामान्य सांघिक कामगिरी!
अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल यांनी पुरुषांच्या 4X400 मीटर रिले क्रीडा प्रकारात नवा आशियाई विक्रम नोंदवत, अंतिम फेरीत धडक मारली.
शानदार पुनरागमन म्हणून याचे स्मरण केले जाईल, भारतीय अॅथलेटिक्स साठी हे ऐतिहासिक आहे.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1952758)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam