पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएई चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
युएई च्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील यशाबद्दल केले अभिनंदन
भारतात आयोजित आगामी G20 परिषदेमध्ये युएई (UAE) चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत: पंतप्रधान मोदी
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2023 10:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएई, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.
युएई च्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे आभार मानले आणि नमूद केले की चांद्रयानचे यश हे संपूर्ण मानवतेचे, विशेषतः ग्लोबल साउथचे यश आहे.
पुढील महिन्यात भारतात आयोजित G20 परिषदेसाठी त्यांच्या स्वागताकरिता आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1951853)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam