पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलच्या पंतप्रधानांशी बातचीत
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन
या स्नेहपूर्ण कृतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2023 10:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.
या स्नेहपूर्ण कृतीची प्रशंसा करत, पंतप्रधान मोदी यांनी भारतातील सर्व लोकांतर्फे नेतान्याहू यांचे आभार मानले आणि त्यांना सांगितले की चांद्रयान मोहिमेचे यश संपूर्ण मानवतेसाठी विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी शुभसूचक आहे.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत संमती दर्शवली.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1951852)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam