पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 16 AUG 2023 8:24AM by PIB Mumbai

माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताच्या 140 कोटी जनतेच्या वतीने आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“ माननीय अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतातील 140 कोटी जनतेसह मी आदरांजली वाहतो  आहे. त्यांच्या नेतृत्वाचा भारताला प्रचंड लाभ झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि एकविसाव्या शतकात विविध क्षेत्रांचा विकास साधण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

***

Jaidevi PS/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1949285) Visitor Counter : 148