गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 954 पोलिसांना पदके जाहीर


सीआरपीएफचा जवान राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाचा मानकरी, 229 जणांना पोलीस शौर्य पदक, 82 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 642 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

प्रवीण साळुंके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

महाराष्ट्रातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर

Posted On: 14 AUG 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक (पीपीएमजी) सीआरपीएफचे जवान लौक्राक्पम इबोमचा सिंह यांना जाहीर झाले असून पोलीस शौर्य पदक (पीएमजी) 229 जणांना जाहीर करण्यात आले आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) 82 जणांना तर गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) 642 जणांना जाहीर झाले  आहे.

सर्वाधिक 230 शौर्य पुरस्कारांमधील 125 पदके डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या प्रभावित  क्षेत्रात तैनात पोलिसांना, 71 जम्मू व काश्मीर क्षेत्रातील आणि 11 पदके ईशान्य क्षेत्रातील पोलिसकर्मींना जाहीर झाली आहेत. शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या पोलिसांमध्ये सीआरपीएफचे 28, महाराष्ट्रातील 33, जम्मू-काश्मीरचे 55, छत्तीसगडचे 24, तेलंगणाचे 22 आणि आंध्र प्रदेशातील 18 पोलीस असून बाकीचे इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि पोलीस शौर्य पदक, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण किंवा गुन्हेगारीला पायबंद किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते.

पुरस्कार विजेत्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

क्र.

पदक

पोलिसांची संख्या

सूची

1

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक (PPMG)

01

List-I

2

पोलीस शौर्य पदक (PMG)

229

List -II

3

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक

82

List -III

4

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

642

List -IV

5

पदकप्राप्त पोलिसांची राज्य/दलानुसार सूची

सूचीनुसार

List-V

Click here to view List-I (राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक)

Click here to view List -II (पोलीस शौर्य पदक) 

Click here to view List -III (विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक)

Click here to view List -IV (गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक) 

Click here to view List-V पदकप्राप्त पोलिसांची राज्य/दलानुसार सूची 

तपशील www.mha.gov.in आणि  https://awards.gov.in वर उपलब्ध आहे. 

पोलीस शौर्य पदकांमध्ये महाराष्ट्रातल्या रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे. राज्यातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. 

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांना  विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.   

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यातल्या 40 पोलिसांना जाहीर झाले आहे. 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील पोलीस उप अधीक्षक सुदेश नाईक यांचा समावेश आहे. 

 

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948488) Visitor Counter : 348