पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वन (संवर्धन) सुधारणा विधेयक 2023 हे नव्या भारताच्या आकांक्षांचा प्रतिध्वनी असल्याचे पंतप्रधानांकडून अधोरेखित

प्रविष्टि तिथि: 08 AUG 2023 2:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेल्या लेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन (संवर्धन) सुधारणा विधेयक, 2023 कडे लक्ष वेधले आहे.

हे विधेयक वन क्षेत्राच्या बाहेर हिरवळ वाढवण्यासाठी तसेच वने अधिक उत्पादक करण्यासाठी नव्या भारतातील जनतेच्या आकांक्षांना कशा प्रकारे प्रतिसाद देते याबद्दलचे विवेचन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या लेखात केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट केले आहे:

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन (संवर्धन) सुधारणा विधेयक, 2023 बाबत लेख लिहिला आहे.....अवश्य वाचा!

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1946642) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam