अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात जुलै 2023 महिन्यात 65,105 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित; 11% वार्षिक वाढ नोंदवली


ही कर प्रणाली लागू करण्यात आल्यापासून वस्तू आणि सेवा कर संकलनाने पाचव्यांदा 1.6 लाख कोटींचा रुपयांचा टप्पा ओलांडला

देशांतर्गत व्यवहारातून मिळणारे उत्पन्नात (सेवांच्या आयातीसह) वार्षिक 15% वाढ

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने तर गोव्याच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ

Posted On: 01 AUG 2023 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

देशात जुलै 2023 मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 37,623 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर 85,930 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) आणि 11,779 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 840 कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहेत.

सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी 39,785 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 33,188 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 69,558 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 70,811 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.

देशातील जुलै 2023 चा  महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत  11% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुला च्या तुलनेत   15% ने अधिक  आहे. सकल वस्तू आणि सेवा कर संकलन पाचव्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने वाढ झाली असून जुलै 2023 मध्ये 26064 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये 22,129 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता.

गोवा राज्याच्या  वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे असून जुलै 2023 मध्ये 528 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. गोव्यात जुलै 2022 मध्ये 433 कोटी रुपये कर संकलन झाले होते.

महाराष्ट्रात, जुलै 2023 महिन्यात 7,958 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले तर 4167 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 12,124 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

गोव्यात, जुलै 2023 महिन्यात 173 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले, तर 146 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 320 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील चढउतार दर्शवितो. तक्ता-1 जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यनिहाय आकडेवारी दर्शवितो तर, तक्ता-2 मध्ये जुलै '2023 या महिन्यात, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राप्त/निश्चित करण्यात आलेला एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कर तसेच राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग दर्शवतो.

जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर महसुलाची राज्यवार वाढ [1] (कोटी रुपयांमध्ये)

State/UT

July’22

July’23

Growth(%)

Jammu and Kashmir

431

549

27

Himachal Pradesh

746

917

23

Punjab

1733

2000

15

Chandigarh

176

217

23

Uttarakhand

1390

1607

16

Haryana

6791

7953

17

Delhi

4327

5405

25

Rajasthan

3671

3988

9

Uttar Pradesh

7074

8802

24

Bihar

1264

1488

18

Sikkim

249

314

26

Arunachal Pradesh

65

74

13

Nagaland

42

43

3

Manipur

45

42

-7

Mizoram

27

39

47

Tripura

63

78

23

Meghalaya

138

175

27

Assam

1040

1183

14

West Bengal

4441

5128

15

Jharkhand

2514

2859

14

Odisha

3652

4245

16

Chhattisgarh

2695

2805

4

Madhya Pradesh

2966

3325

12

Gujarat

9183

9787

7

Daman and Diu

313

354

13

Dadra and Nagar Haveli

Maharashtra

22129

26064

18

Karnataka

9795

11505

17

Goa

433

528

22

Lakshadweep

2

2

45

Kerala

2161

2381

10

Tamil Nadu

8449

10022

19

Puducherry

198

216

9

Andaman and Nicobar Islands

23

31

32

Telangana

4547

4849

7

Andhra Pradesh

3409

3593

5

Ladakh

20

23

13

Other Territory

216

226

4

Center Jurisdiction

162

209

29

Grand Total

106580

123026

15

 

वस्तूंच्या आयातीवरील वस्तू आणि सेवा कर समाविष्ट नाही.

जुलै 2023 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आलेल्या एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराच्या भागाची रक्कम तसेच राज्य वस्तू आणि सेवा कर (कोटी रुपयांमध्ये)

State/UT

SGST collection

SGST portion of IGST

Total

Jammu and Kashmir

234

429

663

Himachal Pradesh

233

285

518

Punjab

727

1138

1865

Chandigarh

57

133

190

Uttarakhand

415

210

625

Haryana

1610

1256

2866

Delhi

1221

1606

2827

Rajasthan

1380

1819

3199

Uttar Pradesh

2751

3426

6176

Bihar

718

1469

2187

Sikkim

30

53

83

Arunachal Pradesh

37

113

150

Nagaland

18

70

88

Manipur

23

58

80

Mizoram

22

57

79

Tripura

40

86

125

Meghalaya

50

99

149

Assam

451

696

1146

West Bengal

1953

1531

3483

Jharkhand

721

330

1051

Odisha

1300

416

1716

Chhattisgarh

627

382

1009

Madhya Pradesh

1045

1581

2626

Gujarat

3293

1917

5210

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

56

29

85

Maharashtra

7958

4167

12124

Karnataka

3181

2650

5831

Goa

173

146

320

Lakshadweep

2

13

14

Kerala

1093

1441

2534

Tamil Nadu

3300

2119

5419

Puducherry

41

57

99

Andaman and Nicobar Islands

11

25

37

Telangana

1623

1722

3345

Andhra Pradesh

1199

1556

2755

Ladakh

11

47

58

Other Territory

19

55

75

Grand Total

37623

33188

7081

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1944730) Visitor Counter : 179