पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाके बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
मृतांच्या नातेवाईकाना मदत जाहीर
Posted On:
29 JUL 2023 4:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
"तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाक्याच्या कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे तीव्र दुःख झाले, ज्यात बहुमोल जीवितहानी झाली. या अत्यंत कठीण काळात मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ही प्रार्थना. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल- पंतप्रधान"
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943985)
अभ्यागत कक्ष : 175
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam