पंतप्रधान कार्यालय

पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उत्पादकता वाढवतील, नवोन्मेषाला चालना देतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील: पंतप्रधान

Posted On: 16 JUL 2023 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2023

 

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 2  पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणी करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“गेल्या काही दिवसांमध्ये, 2 पीएम- मित्र मेगा टेक्सटाईल पार्कसाठी पायाभरणी करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील अमरावती आणि गुजरातमधील नवसारी येथे ही पार्क उभारली जाणार आहेत. ही टेक्सटाईल पार्क उत्पादकता वाढवतील, नवोन्मेषाला चालना देतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील’’.

 

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940007) Visitor Counter : 151