पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गरलार्ड लारचर यांची भेट

प्रविष्टि तिथि: 13 JUL 2023 10:34PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गरलार्ड लारचर यांची 13 जुलै 2023 रोजी भेट घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारीचा भक्कम पाया असलेल्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता या समान मूल्यांचे महत्व अधोरेखित केले.

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेचे प्राधान्यक्रम, तंत्रज्ञानाचा वापर करताना लोकशाही मूल्यांचा अंगीकार आणि दोन वरिष्ठ सभागृहांमधील सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. याव्यतिरिक्त परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील विचारविनिमय झाला.

****

Jaydevi PS/Bhakti/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1939380) आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam