पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचीही पंतप्रधानांकडून पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना आज हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. 498 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित स्थानकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन शुक्ला, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
गोरखपूर - लखनौ वंदे भारत एक्स्प्रेस अयोध्या मार्गे जाईल आणि ही गाडी सुरू केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे आणि उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांशी अधिक चांगला संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे.
जोधपूर – साबरमती वंदे भारत एक्सप्रेस, या क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देत जोधपूर, अबू रोड आणि अहमदाबाद सारख्या प्रसिद्ध ठिकाणांशी दळणवळण सुधारणार आहे.
498 कोटी रुपये खर्चून गोरखपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून तिथे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
* * *
S.Kakade/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1938062)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam