पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रात धुळे येथे झालेल्या अपघातामधील जीवित हानी बद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत जाहीर
Posted On:
04 JUL 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धुळे येथे झालेल्या अपघातामधील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला रु. 2 लाख, आणि जखमींना प्रत्येकी रु. 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:
“महाराष्ट्रात धुळे येथे झालेला अपघात दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना. राष्ट्रीय मदत निधी मधून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला रु. 2 लाख, आणि जखमींना प्रत्येकी रु. 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi”
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1937387)
अभ्यागत कक्ष : 234
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam