पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त.
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2023 10:22AM by PIB Mumbai
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले असून या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत रुपात देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दुःख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत ही सदिच्छा. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”
“ बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50,000 रुपये मदत स्वरूपात दिले जातील".
*****
Mahesh I/S. Mukhedkar /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1936613)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam