पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण
विविध द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा
संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
Posted On:
30 JUN 2023 7:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना रशियामधील अलीकडच्या घडामोडींची माहिती यावेळी दिली.
युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करताना पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे आणि दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याबद्दल सहमती दर्शवली.
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936537)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam