नागरी उड्डाण मंत्रालय
मोबाईलवर डिजी यात्रा अॅप वापरकर्त्यांची संख्या दहा लाखांच्या वर
Posted On:
22 JUN 2023 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2023
मोबाईलवर डिजी यात्रा अॅप्लिकेशन वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या या आठवड्यात दहा लाखांच्या पुढे गेली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी या अॅपचं उद्घाटन केले, तेव्हापासून 1.746 दशलक्ष लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
20 जून 2023 पर्यंत डिजी यात्रा अॅपचे वापरकर्ते:
Digi Yatra App installed base
|
|
|
|
Total App users:
|
1,020 K
|
K=1,000
|
|
Android:
|
866 K
|
App Rating:
|
4.1
|
iOS:
|
154 K
|
App Rating:
|
4.1
|
सुविधेचे उद्घाटन केल्यापासून वापरकर्त्यांची विमानतळ निहाय आकडेवारी:
Airport name
|
Total DY PAX till 20th June 23
|
Last 7 days' average Digi Yatra adoption %age
|
Delhi
|
648,359
|
19.00%
|
Bengaluru
|
503,802
|
14.30%
|
Varanasi
|
225,847
|
76.40%
|
Vijayawada
|
46,668
|
62.20%
|
Kolkata
|
180,361
|
18.70%
|
Pune
|
104,133
|
23.20%
|
Hyderabad
|
37,133
|
4.70%
|
Grand Total DY PAX
|
1,746,303
|
|
सुरूवातीला डिजी यात्रा अॅप सुविधा नवी दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी या तीन विमानतळांवर डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये विजयवाडा, कोलकाता, हैदराबाद आणि पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली. या सात विमानतळांवर डिजी यात्रा सुविधेचा लाभ घेणारे प्रवासी पुढीलप्रमाणे:
Airport Name
|
Total Airport PAX
|
Total DY PAX from 1st April 23 to 20th Jun 23
|
DY PAX adoption %age from the start
|
Last 7 days' average Digi Yatra adoption %age
|
Vijayawada
|
91,313
|
46,668
|
51.11%
|
62.20%
|
Pune
|
875,091
|
104,133
|
11.90%
|
23.20%
|
Kolkata
|
1,675,315
|
180,361
|
10.77%
|
18.70%
|
Varanasi
|
269,237
|
152,585
|
56.67%
|
76.40%
|
Delhi
|
4,803,358
|
465,591
|
9.69%
|
19.00%
|
Hyderabad
|
2,081,400
|
37,133
|
1.78%
|
4.70%
|
Bengaluru
|
2,957,547
|
313,464
|
10.60%
|
14.30%
|
डिजी यात्रा या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उपक्रमात फेशिअल( चेहरा) बायोमेट्रिक पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीचा वापर केला जातो. विमानतळावरील प्रवाशांना अडथळाविरहीत आणि त्रासमुक्त अनुभव मिळावा हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी तिकीट आणि ओळखपत्रांच्या प्रत्यक्ष, पडताळणीची गरज दूर करून उपलब्ध पायाभूत सुविधांद्वारे उत्तम डिजिटल तंत्रज्ञान सेवा देणे हाही या सुविधेचा हेतू आहे.
डिजी यात्रा प्रक्रियेत प्रवाशांची वैयक्तिक ओळख माहिती (पीआयआय) एका ठिकाणी साठवून ठेवली जात नाही.प्रवाशांचा सर्व डेटा प्रवाशांच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये एन्क्रिप्ट आणि संग्रहित केला जातो. प्रवासी जिथून प्रवास सुरू करणार आहे त्या मूळ विमानतळावर मर्यादित कालावधीसाठी डेटा शेअर केला जातो कारण या ठिकाणी डिजी यात्रा ओळखपत्र प्रमाणित करणे आवश्यक असते. उड्डाणाच्या 24 तासांच्या आत प्रणालीमधून डेटा साफ केला जातो. प्रवास सुरू असताना आणि केवळ मूळ विमानतळावर प्रवाश्यांकडून डेटा थेट सामाईक केला जातो. डेटा एन्क्रिप्ट केलेला असल्याने तो इतर कोणताही घटक वापरू शकत नाही आणि कोणत्याही भागधारकांसह तो सामायिक करता येत नाही.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934525)
Visitor Counter : 182