पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केली चर्चा
उभय नेत्यांनी ब्रिक्समधील सहकार्यासह द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचा घेतला आढावा
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधानांना आफ्रिकन नेत्यांच्या शांतता उपक्रमाची दिली माहिती
पुढील वाटचालीसाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या भारताच्या निरंतर आवाहनाचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षपदाला दर्शवले पूर्ण समर्थन
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2023 10:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष मतेमेला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला, जे लोकांमधील ऐतिहासिक आणि सुदृढ परस्पर संबंधांवर आधारित आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 12 चित्त्यांच्या भारतातील स्थानानंतरनाबद्दल पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.
यावर्षी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखालील ब्रीक्समधील सहकार्यासह परस्पर हिताच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला.
राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधानांना आफ्रिकन नेत्यांच्या शांतता उपक्रमाची माहिती दिली. युक्रेनमध्ये शाश्वत शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व उपक्रमांना भारत पाठिंबा देत असल्याचे नमूद करून, पंतप्रधानांनी पुढील वाटचालीसाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.
राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी सुरु असलेल्या जी 20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून भारताच्या पुढाकारांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि ते भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
परस्परांच्या संपर्कात राहण्यासाठी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
***
Nikita J/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931439)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam