पंतप्रधान कार्यालय

सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे केले अभिनंदन

Posted On: 06 JUN 2023 10:45AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टारने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपतीजींचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपतींच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टारने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपतीजींचे अभिनंदन. सुरीनामचे सरकार आणि तिथल्या लोकांचा हा विशेष स्नेहभाव उभय देशांमधील शाश्वत मैत्रीचेच प्रतीक आहे."

***

JaideviPS/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1930138) Visitor Counter : 155