पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 02 JUN 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जुहू ते पुणे या उड्डाणासाठी हेलिकॉप्टरसाठी  कामगिरी-आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण टप्पा ! हे प्रात्यक्षिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम हवाई वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित करते."

 

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 (Release ID: 1929530) Visitor Counter : 112