पंतप्रधान कार्यालय

मैसुरू आणि धनबाद इथल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत जाहीर

Posted On: 29 MAY 2023 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैसुरू आणि धनबाद इथल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यांनी मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्वीट केले आहे ;

‘कर्नाटकमधल्या मैसुरू इथल्या भीषण अपघाताच्या वृत्ताने तीव्र दुःख झाले. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना.’पंतप्रधान

‘धनबाद इथल्या दुर्घटनेतली जीवितहानी अतिशय दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या शोकभावना व्यक्त करत आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना.’पंतप्रधान

‘मैसुरू आणि धनबाद इथल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला   पंतप्रधान सहाय्यता निधीतून, 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. जखमींना 50, 000 रुपयांची मदत देण्यात येईल’.

 

 

 

* * *

N.Chitale/Nilima/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928169) Visitor Counter : 92