पंतप्रधान कार्यालय
आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मे रोजी दाखवणार हिरवा झेंडा
आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील नवीन जलपाईगुडी हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस साडेपाच तासात कापणार, सध्याची सर्वात जलद रेल्वेगाडी याच प्रवासासाठी घेते साडेसहा तास
नवीन विद्युतीकरण विभागाचे लोकार्पण आणि नव्याने बांधलेल्या डेमू/ मेमू शेडचेही पंतप्रधान करणार उद्घाटन
Posted On:
28 MAY 2023 5:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला 29 मे रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
अद्ययावत आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या या गाडीमुळे या भागातील लोकांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. ही रेल्वे गाडी गुवाहाटीला पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी स्थानकाला जोडणार असून त्यामुळे सध्या या दोन स्थानकांमध्ये धावणाऱ्या सगळ्यात वेगवान गाडीच्या तुलनेत या गाडीने प्रवास करताना एक तास वाचणार आहे. वंदे भारत हे अंतर साडेपाच तासात कापणार असून आत्ताच्या वेगवान गाडीला तेच अंतर पार करायला साडेसहा तास लागतात.
नव्याने विद्युतीकरण झालेल्या 182 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त परिवहनाला मदत होणार असून गाड्या अधिक वेगाने धावतील आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. या मार्गामुळे मेघालयात प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्या सुरू करता येणार आहेत.
आसाममध्ये लंबडिंग येथे नव्याने बांधलेल्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट डेमू- मेनलाईन इलेक्ट्रिक युनिट मेमू- शेडचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. ही नवीन सुविधा या प्रदेशात डीईएमयू डब्यांसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे अधिक सुकरपणे काम होईल.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927912)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam