आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

76 व्या जागतिक आरोग्य संमेलनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केले संबोधित


"डिजिटल आरोग्यावर जागतिक उपक्रम हा विशेषतः कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांसाठी जागतिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी कार्य करेल"

Posted On: 24 MAY 2023 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मे 2023

 

‘सर्वांसाठी आरोग्य’  या संकल्पनेवर केंद्रित जागतिक आरोग्य संमेलनाच्या 76 व्या अधिवेशनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी संबोधित केले.  जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस,आणि जगभरातील आरोग्य  मंत्री या संमेलनाला उपस्थित होते.

आरोग्य आणीबाणी सज्जता, वैद्यकीय प्रतिबंध उपलब्धता आणि डिजिटल आरोग्य या जी 20 च्या भारताच्या आरोग्याच्या प्राधान्यक्रमांचा उल्लेख करत, भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असलेला  जगाला अधिकाधिक जोडणारा अजेंडा कोविड-19 महामारीच्या  अभूतपूर्व परिस्थितीने अधिक बळकट  केला आहे.", डॉ. मांडवीया यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी प्रादेशिक जाळे आणि "डिजिटल आरोग्यावर जागतिक उपक्रमाद्वारे  वितरित उत्पादन तसेच  संशोधन आणि विकासासह जागतिक वैद्यकीय प्रतिबंधात्मक मंचाचा प्रस्ताव दिला. ''सर्व देशांना सुरक्षित, उच्च-गुणवत्तेचे, किफायतशीर वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपायांसाठी समान प्रवेश सुनिश्चित करणे हे जागतिक वैद्यकीय प्रतिबंधात्मक मंचाचे उद्दिष्ट आहे." असे त्यांनी सांगितले.

"डिजिटल आरोग्यावरील  जागतिक उपक्रम  जगासाठी आणि विशेषत: कमी आणि मध्यम-उत्पन्न देशांसाठी   डिजिटल साधनांचे अनुकूलन  आणि लोकशाहीकरण करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक वस्तूंच्या प्रोत्साहनासाठी  एकमत निर्माण करण्यात मदत करेल." असे डॉ. मांडवीया यांनी जागतिक डिजिटल दरी  कमी करण्याची गरज अधोरेखित करताना सांगितले. "डिजिटल आरोग्यावरील जागतिक उपक्रमाचे  उद्दिष्ट संस्थात्मक चौकट  म्हणून कार्य करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह लवचिक आणि वेगवान डिजिटल उपाय प्रदान करणे हे  आहे" असा पुनरुच्चार त्यांनी केला.

डॉ. मांडविया यांचे संबोधन या दुव्यांवर पाहता येईल:

https://www.youtube.com/watch?v=gdjySw1_IAo

https://www.youtube.com/watch?v=52lYgc326eg

 

डॉ. मांडविया यांच्या भाषणाचे ट्विटर दुवे खाली दिले आहेत:

https://twitter.com/mansukhmandviya/status/1660995459945750529

https://twitter.com/mansukhmandviya/status/1661027076533813249

https://twitter.com/mansukhmandviya/status/1661034966736830467

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926884) Visitor Counter : 131