पंतप्रधान कार्यालय
कोरिया प्रजासत्ताकच्या अध्यक्षांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
20 MAY 2023 12:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष यून सुक येओल यांची 20 मे 2023 रोजी भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि व्यापार आणि गुंतवणूक, उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादन, संरक्षण, सेमी कंडक्टर्स आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारविनिमय केला.
या वर्षी दोन्ही देश त्यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत असे या नेत्यांनी सांगितले आणि परस्पर सहकार्य आणखी वाढविण्यावर सहमती दर्शवली.
कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेसाठी प्रशंसा केली आणि आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. या वर्षी सप्टेंबरमध्ये जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती यून यांच्या भारत भेटीची वाट पाहत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कोरिया प्रजासत्ताची हिंद प्रशांत रणनीती आणि कोरिया भारताला देत असलेल्या महत्वाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक घडामोडींवरही सकारात्मक विचार मंथन झाले.
****
Jaydevi PS/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925810)
Visitor Counter : 147
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam