महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सक्षम अंगणवाडी अभियान आणि पोशन 2.0 अंतर्गत, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी “पोषण भी, पढाई भी” या शिशु संगोपन आणि शिक्षण या कार्यक्रमाचा केला प्रारंभ

Posted On: 12 MAY 2023 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2023

शिशु संगोपन आणि शिक्षण (ईसीसीई) बळकट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी 10 मे 2023 रोजी विज्ञान भवन येथे पोषण भी, पढाई भी म्हणजे पोषणासोबत शिक्षण '' या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई, महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव इंदिवर पांडे, आणि मंत्रालयाच्या शिशु संगोपन आणि शिक्षण कृती दलाचे अध्यक्ष संजय कौल  उपस्थित होते.

या कार्यक्रमात  केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी, 800 हून अधिक राज्य प्रतिनिधी,एकात्मिक बाल विकास सेवेतील  पदाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी , पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत मुख्य भाषण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी)अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये उदा., शारीरिक/गतीप्रेरक, आकलनविषयक सामाजिक-भावनिक-नैतिक, सांस्कृतिक/कलात्मक कौशल्ये निर्माण करण्यावर आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या शिशु संगोपन आणि शिक्षण कृती दलाच्या शिफारशींच्या अनुषंगाने‘पोषण भी पढाई भी’ अंतर्गत संवाद आणि प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्या ओळख विकास यावर लक्ष केंद्रित करून 6 वर्षांखालील सर्व मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याची सरकारची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली. राज्य सरकारे, तज्ञ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालक आणि समुदाय यांच्याशी संपूर्ण विचारविनिमय करून कृती दलाने शिफारसी सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन अध्यापन सामग्री आणि पद्धतींबद्दल (टीएलएम) बोलताना, शिशु संगोपन आणि शिक्षण सामग्री आणि दृकश्राव्य सामग्रीची चाचणी 10,000 समुदायांमधील 1.5 दशलक्ष पालकांसोबत 1 लाख उपक्रमांद्वारे करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. दिव्यांग मुलांसाठी शिशु संगोपन आणि शिक्षणामधील पद्धती विकसित करण्याच्या तसेच पालकांना त्यांच्या  मुलांना अंगणवाडी केंद्रात पाठवण्याचा सल्ला अंगणवाडी सेविका देऊ शकतील या अनुषंगाने, शिक्षणाच्या महत्त्वावरही त्यांनी  भर दिला.

खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना देण्यात आलेल्या लाकूड, कापड, माती, चिकणमाती यांसारख्या स्थानिक आणि सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीसह स्वदेशी आणि  स्वतः खेळणी तयार करण्याबद्दलही केंद्रीय मंत्र्यांनी पायाभूत विकासात नवीन अध्यापन सामग्री आणि पद्धतींच्या स्वरूपात खेळण्यांची भूमिका अधोरेखित करताना सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार सुमारे 7 कोटी मुलांची उंची आणि वजन मोजणाऱ्या आणि त्यानंतर मार्च 2023 मध्ये पोषण पंधरवडा  दरम्यान पोषण ट्रॅकर आयसीटी मंचावर माहिती अपलोड करण्यासाठीची अंगणवाडी सेविकांची तळमळ आणि वचनबद्धता अधोरेखित करत इराणी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

 

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1923738) Visitor Counter : 148