पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आयआयटी मद्रास येथे ‘बंदरे, जलमार्ग आणि किनारे’ यांच्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान केंद्राच्या उद्घाटनाचे केले स्वागत
Posted On:
25 APR 2023 9:24AM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते चेन्नई, येथील आयआयटी एम (IIT M) डिस्कव्हरी कॅम्पस येथे बंदरे, जलमार्ग आणि किनारे (NTCWPC) संशोधनात उपयोगी ठरणाऱ्या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन झाले.
आयआयटी चेन्नईमध्ये सागरमाला कार्यक्रमांतर्गत, 77 कोटी रुपये खर्चून या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राची (NTCWPC) स्थापना करण्यात आली आहे. हे सर्वांसाठी आदर्श ठरेल असे केंद्र असून, वैज्ञानिक आधार, शिक्षण, स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावहारिक संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण याद्वारे सागरी क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
“आयआयटी चेन्नई मधील NTCWPC देशाच्या सागरी क्षेत्राच्या वृद्धीला अधिक बळकट करेल.”
***
S.Thakur/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919376)
Visitor Counter : 186
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam