पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशातील युवा वर्गाला सीमेवरील गावांना भेट देण्याचे केले आवाहन
Posted On:
11 APR 2023 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना, विशेषतः युवा वर्गाला देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे आपल्या युवा वर्गाची विविध संस्कृतींशी ओळख होईल आणि त्यांना सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
अमृत महोत्सव उपक्रमातर्फे चालवण्यात येत असलेल्या ट्विटर खात्यावर ट्विटद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की चैतन्यमयी गावे कार्यक्रमाअंतर्गत ओदिशा राज्यातील काही तरुण सध्या किबीथू आणि तुतिंग या गावांना भेट देत आहेत.
चैतन्यमयी गावे कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना ईशान्य भागातील काही गावांना भेटी देऊन तेथील जीवनशैली, जमाती,लोकसंगीत आणि हस्तकला यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची आणि तेथील स्थानिक वैशिष्ट्ये तसेच निसर्ग सौंदर्य यांच्यात मग्न होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे
अमृत महोत्सव उपक्रमातर्फे करण्यात आलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
“या युवकांना खरोखरीच अत्यंत अविस्मरणीय अनुभव मिळाला असेल. मी देशातील सर्वांनाच, विशेषतः युवा वर्गाला विनंती करतो की त्यांनी एकदा देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना भेट द्यायला हवी. या भेटींमुळे, आपल्या युवा वर्गाला विविध संस्कृतींची ओळख करून घेता येईल आणि त्यांना सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.”
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915608)
Visitor Counter : 225
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam