पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नागरीकांना दिल्या ईस्टरच्या शुभेच्छा

Posted On: 09 APR 2023 10:02AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टर सणाच्या निमित्ताने नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि या विशेष प्रसंगी आपल्या समाजात सौहार्दाची भावना अधिक प्रगल्भ व्हावी अशी मनीषा व्यक्त केली आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"ईस्टरच्या सर्वांना शुभेच्छा! या सणाच्या निमित्ताने आपल्या समाजातील सौहार्दाची भावना अधिक प्रगल्भ होवो. यामुळे लोकांना समाजसेवेची आणि दलितांना सबळ करण्यास मदत करण्याची प्रेरणा मिळो. या दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रभु ख्रिस्ताच्या पवित्र विचारांचे स्मरण करत आहोत."

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

***

S.Pophale/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915008) Visitor Counter : 176