पंतप्रधान कार्यालय

शहरांमधील गॅस वितरण नेटवर्कमधील प्रगतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक


देशातील शहरांमधील गॅस वितरण नेटवर्कमध्ये 2014 मधील 66 जिल्ह्यांच्या तुलनेत आता 630 जिल्ह्यांचा समावेश

Posted On: 05 APR 2023 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

देशात्तील शहरी गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार वाढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की शहर गॅस वितरण नेटवर्कने सुलभ  आणि परवडणारे इंधन पुरवण्यात  मोठी  प्रगती केली आहे. 2014 मध्ये शहर गॅस वितरण नेटवर्कमध्ये  देशातील 66 जिल्हे सहभागी होते, 2023 मध्ये 630 जिल्ह्यांचा समावेश झाला आहे; देशभरातील घरगुती पीएनजी जोडण्यांची संख्या 2014 मधील  केवळ 25.40 लाखांवरून आता 103.93 लाख जोडण्या अशी झाली  आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

"ही उल्लेखनीय आकडेवारी  आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे ज्यांनी मेहनत केली , त्या सर्वांचे मी कौतुक करतो."

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913834) Visitor Counter : 102