पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी एचएएलचे केले कौतुक

Posted On: 01 APR 2023 9:21AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवल्याबद्दल एचएएलच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले आहे. एचएएलने आर्थिक वर्ष 2022-23 मधे 26,500 कोटी (तात्पुरता आणि लेखापरिक्षण न झालेला) रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात तो 24,620 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूलात 8 टक्के वाढ झाली आहे. 

एचएएलच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;

“अतुलनीय!  मी एचएएलच्या संपूर्ण चमुचे त्यांच्या उल्लेखनीय ध्येयासक्ती आणि समर्पणवृत्तीबद्दल कौतुक करतो.'

****


MI/Vinayak/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912814) Visitor Counter : 210