पंतप्रधान कार्यालय
कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
कामाचे व्यग्र वेळापत्रक आणि बैठी जीवनशैली यामुळे निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाच्या ठिकाणीही विश्रांतीच्या वेळी सर्वांनी योगासने करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी "वाय- ब्रेक" योगावर एक मिनिटाच्या चित्रफिती अनावरण केले. मोठ्या प्रमाणात योग सहभागाला प्रोत्साहन दिले जावे, विशेषत: कामाच्या ठिकाणी आणि कामाचे व्यसन असणाऱ्यांकडून योग केला जावा, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल आयुष मंत्रालयाने केलेल्या ट्विटला समाईक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“कामाचे व्यग्र वेळापत्रक आणि बैठी जीवनशैली नवीन आव्हाने घेऊन येतात. निरोगी राहण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे.’’
* * *
S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907362)
आगंतुक पटल : 208
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam