पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी सांगितलेला एक किस्सा पंतप्रधानांनी ट्वीटमधून केलेला सामाईक
Posted On:
12 MAR 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंधांविषयीचा एक ट्वीट थ्रेड पंतप्रधानांनी शेयर केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्या सन्मानार्थ ठेवलेल्या मेजवानीच्या वेळी, व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी हा किस्सा सांगितला होता.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.
"माझे मित्र, पंतप्रधान @AlboMP यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीच्या वेळी, ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी हा अतिशय रोचक किस्सा सांगितला होता. ते जेव्हा इयत्ता पहिलीत होते, तेव्हा त्यांच्या शिक्षिका श्रीमती एबर्ट यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे श्रेय ते आपल्या या शिक्षिकेलाच देतात.
या श्रीमती एबर्ट, त्यांचे यजमान आणि त्यांची कन्या लिओनी 1950 च्या दशकात भारतातील गोव्यातून अॅडलेडमध्ये स्थलांतरित झाले आणि ऑस्ट्रेलियातील अॅडलेड इथल्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्यांची कन्या लिओनी पुढे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या शिक्षक संघटनेची अध्यक्षही बनली.
भारत आणि ऑस्ट्रेलियातील समृद्ध आणि प्रदीर्घ अशा संबंधांविषयीचा हा किस्सा ऐकून मला फार आनंद झाला. तसेच कोणी जेव्हा आपल्या शिक्षकांविषयी इतक्या आत्मीयतेने बोलते, तेव्हा ते ही एक वेगळे समाधान देणारे असते.”
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906153)
Visitor Counter : 226
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam