पंतप्रधान कार्यालय
सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या “सुदृढ बालक” मोहिमेचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2023 2:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या “सुदृढ बालक” मोहिमेचे कौतुक केले आहे. ईशान्य क्षेत्राचे केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या ट्विट थ्रेडला पंतप्रधान प्रतिसाद देत होते. या मोहीमेचा प्रारंभ सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कॉलनी, सोसायटी आणि प्रत्येक वस्तीमध्ये “सुदृढ बालक” स्पर्धेसाठी नावनोंदणी फॉर्म वितरणाने करण्यात आला होता, अशी माहिती रेड्डी यांनी माहिती या ट्विटमध्ये दिली आहे. सुदृढ बालके आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र तसेच ‘पोषण किट्स’ देऊन गौरविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटच्या थ्रेडला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे, ज्याचा मुलांना खूप फायदा होईल."
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902003)
आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam