पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
24 FEB 2023 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
“छत्तीसगडच्या बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात झालेल्या अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो : पंतप्रधान @narendramodi”
“बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातील अपघातातील प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून रु. 2 लाखांची मदत दिली जाईल.जखमींना रु. 50,000 देण्यात येणार आहेत. "
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902000)
Visitor Counter : 164
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam