पंतप्रधान कार्यालय

सिनेटचे बहुमत असलेले नेते चार्ल्स शुमर यांच्या नेतृत्वाखालील नऊ सिनेटर्सच्या अमेरिकन कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट


भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय सहाय्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

पंतप्रधानांनी अध्यक्ष बायडेन यांच्याशी नुकताच दूरध्वनीवरून साधलेला संवाद आणि भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याबाबत दोन्ही नेत्यांच्या सामायिक दृष्टिकोनाचे केले स्मरण

पंतप्रधान आणि अमेरिकी शिष्टमंडळाने सामायिक लोकशाही मूल्ये, मजबूत द्विपक्षीय सहकार्य, दोन्ही देशांच्या जनतेतील दृढ संबंध आणि अमेरिकेतील उत्साही भारतीय समुदाय हे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे नमूद केले

भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी नव्या संधींबाबत पंतप्रधानांनी अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी केली चर्चा

Posted On: 20 FEB 2023 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

सिनेटचे बहुमत असलेले नेते चार्ल्स शुमर यांच्या नेतृत्वाखालील नऊ सिनेटर्सच्या अमेरिकन कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सिनेटर रॉन वायडेन, सिनेटर जॅक रीड, सिनेटर मारिया कँटवेल, सिनेटर एमी क्लोबुचर, सिनेटर मार्क वॉर्नर, सिनेटर गॅरी पीटर्स, सिनेटर कॅथरीन कॉर्टेझ मास्टो आणि सिनेटर पीटर वेल्च यांचा समावेश होता.

पंतप्रधानांनी अमेरिकी काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत केले आणि भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय मदतीची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी अलिकडेच  झालेल्या दूरध्वनी संभाषणाबद्दल सांगितले आणि समकालीन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत-अमेरिका सर्वसमावेशक  जागतिक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याच्या  दोन्ही नेत्यांच्या सामायिक दृष्टिकोनाचा उल्लेख केला.

पंतप्रधान आणि अमेरिकी  शिष्टमंडळाने सामायिक लोकशाही मूल्ये, मजबूत द्विपक्षीय सहकार्य, दोन्ही देशांच्या जनतेतील दृढ संबंध आणि अमेरिकेतील उत्साही भारतीय समुदाय हे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे नमूद केले.

महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, संयुक्त विकास आणि निर्मिती तसेच विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी क्षेत्रात भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासंबंधी नवीन  संधींबाबत पंतप्रधानांनी अमेरिकी शिष्टमंडळाशी चर्चा केली.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1900866) Visitor Counter : 159