पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशातील जनतेचे जीवन आणखी सुकर करण्यासाठी भारत तंत्रज्ञानाला अधिकाधिक महत्त्व देत आहे : पंतप्रधान

Posted On: 17 FEB 2023 10:34AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, देशातील जनतेचे जीवन आणखी सुकर करण्यासाठी भारत तंत्रज्ञानाला अधिकाधिक महत्त्व देत आहे. ऋषिकेश येथील एम्स संस्थेने जीवनावश्यक औषधांची जलद वाहतूक करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन्सची यशस्वी चाचणी केल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्विट संदेशावर पंतप्रधानांनी हा प्रतिसाद दिला. या चाचणी फेरीमध्ये ऋषिकेश येथील एम्स संस्थेमधून क्षयरोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या 2 किलोग्रॅम औषधांचा साठा सुमारे 40 किलोमीटरचे अंतर  (30 मिनिटांचे हवाई अंतर) पार करून तेहरी गढवाल जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:


***

SuvarnaB/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1900083) Visitor Counter : 238