पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 17 फेब्रुवारी रोजी ‘इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस’शिखर परिषदेला करणार मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2023 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे संध्याकाळी 7:40 च्या सुमारास ‘इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस’शिखर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
‘ग्लोबल बिझनेस परिषदेसाठी यंदा "लवचिकता. प्रभाव. वर्चस्व" अशी संकल्पना निश्चित केली आहे.17आणि 18 फेब्रुवारी असे दोन दिवस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
टाइम्स समूहाच्यावतीने दरवर्षी ‘ग्लोबल बिझनेस’परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेच्या माध्यमातून नेते, धोरण निर्माते, शिक्षणतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट प्रमुखांना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणण्यात येते, आणि प्रमुख आर्थिक आव्हानांवर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातो. या शिखर परिषदेत वेगवेगळ्या 40 सत्रांमधून उद्योग क्षेत्रातील 200 हून अधिक अग्रणी आपले विचार मांडणार आहेत.
S.Kulkarni/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1899956)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam