पंतप्रधान कार्यालय
जाफना सांस्कृतिक केंद्र हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्य दर्शवणारा एक महत्त्वाचा उपक्रम : पंतप्रधान
Posted On:
11 FEB 2023 9:43PM by PIB Mumbai
जाफना सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची उपस्थिती अधोरेखित केली. पंतप्रधानांनी 2015 मध्ये या केंद्राची पायाभरणी केली होती आणि त्या खास भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"जाफना सांस्कृतिक केंद्र हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे.याचा फायदा अनेकांना होईल. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आणखीनच खास झाला.
2015 मधील माझी जाफना भेट माझ्या सदैव स्मरणात राहील. त्यावेळी मला जाफना सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती .
त्या भेटीची ही काही क्षणचित्रे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898414)
Visitor Counter : 239
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam